Updated: May 7, 2020 12:13:00 pm
भारतीय संघाचा वेगवान गोलंदान महम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद सर्वांनाच ठाऊक आहे. घरगुती हिंसाचार असेल किंवा मॅच फिक्सिंगसारखे असे अनेक आरोप तिनं महम्मद शमीवर केले होते. त्यावेळी शमीनं उत्तर देणं टाळलं होतं. शमीची पत्नी हसिन जहाँ हिचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती काँटा लगा या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ तिच्या काही फॉलोअर्सच्या पसंतीस उतरला आहे. तर काहींनी तिला पुन्हा महम्मद शमीकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. “झालं गेलं सर्व विसरून जा. शमीकडे परत जा. किमान आपल्या मुलीचा विचार कर,” असा सल्ला तिला एका युझरनं दिला आहे.
अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप मोहम्मद शमीच्या पत्नीनं फेसबुकवरून केला होता. शमीची पत्नी हसीन जहाँने फेसबुकवर शमीच्या काही अश्लील चॅट्स आणि काही मुलींचे फोटोही अपलोड केले होते. यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शमीशी संबंध आहेत, असा आरोप त्याच्या पत्नीनं फेसबुक पोस्टद्वारे केला होता.
हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर या दोघांचाही वाद चव्हाट्यावर आला. मोहम्मद शमी, त्याचा भाऊ, त्याची आई हे आपला छळ करत असल्याचाही आरोपही हसीन जहाँने केला होता. पैशांसाठी आपल्याला उपाशी ठेवले गेले, माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला असाही आरोप हसीन जहाँने केला होता.